खंडाळा – शालेय खो- खो स्पर्धेत सातारा जिल्हयातील खंडाळा विरुद्ध धाराशीव येथील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामना झाला. त्यामध्ये खंडाळ्यातील राजेंद्र विद्यालयाच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले असून यशस्वी खेळाडुंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खंडाळा शहरात असणाऱ्या राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विभागीय शालेय खो-खो स्पर्धा पार पडल्या.त्यामध्ये १४ वर्षांखालील मुलांचा संघाने सांगली जिल्ह्याच्या संघावर मात करून कोल्हापूर विभागात खंडाळ्याच्या संघाने इंचलकरंजी संघावर एक डाव व एक गुण मिळवत विभागीय स्तरावर विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत यश मिळविले होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.दरम्यान,या स्पर्धेत खंडाळा विरुद्ध धाराशीव येथील मुलांच्या संघाचा अंतिम सामाना पार पडला.त्यामध्ये जिल्हयातील खंडाळ्यात असणाऱ्या राजेंद्र विद्यालयाच्या संघाने अजिंक्य पद पटकावले असून राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या खो-खो स्पर्धेच्या महाराष्ट्र संघासाठी स्वराज गाढवे, प्रतिक खंडागळे,स्वराज उत्तेकर,वरद पोळ या खेळाडूंची निवड झाली आहे.
या संघातील विजयी खेळाडू व मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक डी.जी.गाढवे,व्हि.एन.गाढवे,महेंद्र गाढवे, व्हि.एस.राऊत,विवेक तळेकर,प्रशिक्षक दिग्विजय खंडागळे,विनोद खंडागळे,आकाश लिमन, अनिकेत गाढवे यांचे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध गाढवे,प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्य अरूंधती गाढवे,उपमुख्याध्यापक सुशिला मोहिते,पर्यवेक्षक धनंजय महामुनी,नगसेवक शैलेश गाढवे,शिक्षक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.