सर्वांना कायद्याचं ज्ञान आवश्यक – ॲड.फडके
खंडाळा – शिक्षण आणि व्यवहारिक माहीती बरोबर सर्वांना कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक असल्याचे मत ॲड.आनंद फडके यांनी व्यक्त केले.
खंडाळा येथील राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयात तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय खंडाळा यांच्यावतीने कायदेविषयक जन जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य शब्बीर नालबंद हे होते.
यावेळी प्रमुख अतिथी ॲड.आनंद फडके यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन करीत सर्वांना कायद्याचे ज्ञान असणं आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.तसेच एड्स जनजागृती या विषयी ॲड.अनिस मुजावर यांनी तर ॲड.प्रतिक शेळके यांनी मानवी हक्क व त्याची गरज या विषयावर अणि ॲड. महेश राऊत यांनी पिडीतांसाठी मानधन योजना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद म्हणाले की, भारतीय राज्यघटना व कायदे हा आपल्या देशाचा आत्मा आहे.राज्यघटनेचे व कायद्याचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे.
याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री खांडके यांनी तर प्रास्ताविक प्रविण बोरगावे यांनी केले.शेवटी सर्व उपस्थितांचे जे.एस.सांळूखे यांनी आभार मानले.