खंडाळा – तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये खंडाळ्यातील राजेंद्र उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात प्रथम आणि व्दितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
नायगांव (ता. खंडाळा ) येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्यावतीने महात्मा फुले जयंती निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या गटात राजेंद्र उच्चमाध्यमिक विद्यालयातील वृषाली महिंद्रकर हीने प्रथम तर स्वराज कदम याने द्वितीय क्रमांक मिळवत राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयास उज्वल यश
मिळाले. या यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागातील प्रवीण बोरगावे,जयप्रकाश गेजगे यांनी मार्गदर्शन केले.
तर यशस्वी विद्यार्थ्यांचे खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा संस्थेचे अध्यक्ष शंकररावजी गाढवे,सचिव अनिरुद्ध गाढवे, विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्या अरुंधती गाढवे, उपमुख्याध्यापक सुशीला मोहिते, पर्यवेक्षक धनंजय महामुनी यांच्यासह आदी शिक्षक पालकांनी अभिनंदन केले.