खंडाळाराजकारण

घराणेशाही संपवण्यासाठी स्वाभिमानी खंडाळा तालुक्याने साथ द्यावी – पुरुषोत्तम जाधव

खंडाळा –        वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील घराणेशाही व मस्तवाल सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी आता खंडाळा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने माझ्यासारख्या सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबातील उमेदवाराला साथ द्यावी. तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने पाठीशी राहा असे अवाहन वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी भादे ता.खंडाळा येथील प्रचार सभेत केले.

अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी पिसाळवाडी, धनगरवाडी, माने कॉलनी, भोळी, शेखमीरवाडी, लोणी ,तोंडल, भादे ,वाठार ,शेडगेवाडी, अंदोरी, भाऊ बावकलवाडी ,मरीआईचीवाडी, पिंपरी, पाडेगाव, लोणंद येथे जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तेथील प्रश्न जाणून घेतले.

पुरुषोत्तम जाधव म्हणाले, विद्यमान आमदार यांनी कधीही वाई खंडाळा महाबळेश्वरच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवला नाही. कार्यक्षमता नसलेले लोकप्रतिनिधी गेल्या पन्नास वर्षात खंडाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत.वाई खंडाळा तालुक्यातील हक्काचे पाणी दुसऱ्या जिल्ह्यात गेले मात्र आपला खंडाळा तालुका मात्र कोरडाच राहिला. आपल्या मतदारसंघात तीन-तीन जलसिंचन योजना असून त्याला योग्य तो निधी मिळत नाही ,याला जबाबदार कोण? खंडाळा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने आता विद्यमान आमदारांना घरी बसवावे व आपल्या सुखदुःखात असणाऱ्या माणसाला साथ द्यावी. शिरवळ, खंडाळा येथील औद्योगिक विकासाला चालना देऊन स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व्यवसायासाठी प्रेरित करण्याची गरज असताना मूकनायक आमदार मात्र कोणतेही काम करताना दिसत नाहीत.

सर्व सत्ता एकाच घरात घेऊन सामान्य नागरिकांच्या वर दबाव निर्माण करण्याचे षडयंत्र सध्या मतदारसंघात सुरू असून २० तारखेला सामान्य मतदार वाई – खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात क्रांती घडवेल असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

चौकट….

पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंबाची मतदारसंघात भिंगरी

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पत्नी, मुलगा, दोन मुली ,जावई ,नातवंडे असा संपूर्ण परिवार प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!