खंडाळा – खांबाटकी घाटात वृक्षसंवर्धना बरोबर तालुक्यात विविध उपक्रम राबविणाऱ्या ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात पार पडला.
खंडाळा शहरातील ग्रामविकास संस्थेने वाघोशी, साळव,खंडाळा वनराई प्रकल्प,महामार्गावर असणाऱ्या खांबाटकी घाटात वृक्षसंवर्धन,वन्य प्राण्यांसाठी हरेश्वर वनराई पाणलोट क्षेत्र विकास, कामधेनू गोशाळा,गुरुकुल विद्यामंदिर प्रिस्कूल, ग्रामसंजीवनी निसर्ग उपचार केंद्र,सेंद्रिय शेती फळभाजी उत्पादक शेतकरी गट आदी उपक्रम राबविले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान,ॲड.बाळकृष्ण पंडित यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आनंद भारमल,सुनिल खुडे,उमेश पवार, मोहन खंडागळे,दिग्विजय खंडागळे, राहुल डेरे,निखिल खंडागळे आणि किल्ले स्पर्धेत सहभगी विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ,प्रतिमा भेट देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास बाळकृष्ण पंडित,निलेश शेळके,प्रविण पाटील,अजित जाधव,सुनील रासकर,दिलिप महामूनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरीष गाढवे,अजित कुंभार,संतोष देशमुख,बापू रासकर,तानाजी शिर्के, सुरज साळुंखे,मयुर पटेल,केतन पवार,रोहित पवार, आश्विनी शेवाळे,सुप्रिया ननावरे,सोमनाथ ननावरे, मयुर शिर्के आदींनी परिश्रम घेतले.
प्रारंभी प्रास्ताविक संदीप ननावरे यांनी केली.तर सूत्रसंचालन अविनाश सोनवलकर यांनी केले.शेवटी सर्व उपस्थितांचे आनंद गुळूमकर यांनी आभार मानले.