खंडाळा- आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे विद्यार्थ्याना गिरवीता येणार असून स्वातंत्र्य दिनी खंडाळ्यातील राजेंद्र विद्यालयात ए.आय. शिक्षणाचा शुभारंभ होणार आहे.
खंडाळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संधी मिळणार असून गुरुवार दि.15 रोजी सकाळी 9.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे,सचिव अनिरुद्ध गाढवे, प्राचार्य शब्बीर नालबंद, संस्थेचे संचालक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दरम्यान,गुरुजी एअर इंटरनॅशनलने “इंटरनॅशनल एअर एज्युकेशन फॉर सोशल चेंज “संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू होत आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य नालबंद यांनी केले आहे.