वृक्षमित्रांच्या श्रमातून बहरले वटवृक्ष
खंडाळा – देशी झाडांबरोबर वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली असून त्यांची जोपासना करित हरेश्वर संवर्धन ग्रुप आणि वृक्षमित्रांच्या श्रमातून तीन वर्षात पन्नास वटवृक्ष बहरले आहेत.
केवळ फांद्या तोडून पुजा न करता प्रत्यक्ष वड लावून वटपोर्णिमा साजरी करु या,अशा संकल्पनेतून खंडाळा येथील महिलांनी पुढाकार घेत 2021 मध्ये हरेश्वर संवर्धन ग्रुपच्या सहकार्यातून पन्नास वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली.काही दिवसानंतर पिंपळ, पिपरन,जांभूळ,आवळा,चिंच,आंबा,पेरु,उंबर,रामफळ, चेरी,कडुलिंब,शिवण,गुगळे,शिरीष,कांचन, बेल,आपटा, लिंबू,बदाम,चाफा,सिताफळ अशा पाचशे देशी झाडांची लागवड केली आहे.
तर खंडाळ्यामध्ये वृक्षसंवर्धन कार्यात खंडाळा नगरपंचायत,हरेश्वर संवर्धन ग्रुप,ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था,गुरुकुल विद्यामंदिर,श्री. अष्टविनायक ग्लास कंपनी,सुशिलाताई गाढवे महाविद्यालयाचे एन.एस.एस विभागातील विद्यार्थी, सेवा सह्योग संस्था पुणे,आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार खंडाळा यांचे साह्य लाभत आहे.
वृक्षमित्रांच्या श्रमदानातून लावण्यात आलेल्या झाडांसाठी आठवड्यातून एकदा श्रमदान केले जाते. वार्षिक वर्गणीतून टॅकरने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असून खते,संरक्षक जाळी,गवत काढणे आदी कामे एकत्रित केली जातात.
तसेच वृक्षमित्र डॉ.वीणा पंडित, अदित्य गाढवे,डॉ सचीन कुलकर्णी, अमित खंडागळे,मिलिंद देशमुख, सिंधू बरकडे,सुप्रिया ननावरे,दिपक शिर्के, शिरीष गाढवे ,संतोष देशमुख,दिपक सूर्यवंशी,मयुर शिर्के,गणेश गाढवे,मोहन खंडागळे,तानाजी गाढवे, सुरज साळुंखे, निखिल खंडागळे,आनंद गुळूमकर, मुकेश पटेल,गोविंद गाढवे,मयुर पटेल, दिगंबर गाढवे, हणमंत गाढवे,चेतन पटेल,अमित पळसकर, जितेंद्र पानसरे, प्रल्हाद राऊत, दिलिप महामुनी,राहुल देशमाने,गणेश गजफोडे,विवेक तळेकर,सागर घाडगे, सोमनाथ ननावरे पवन जाधव, विश्वनाथ खंडागळे यांच्या प्रयत्नातून गत तीन वर्षात झाडे बहरली आहेत.