कृषी
खंडाळा पंचायत समितीमध्ये गुरुवारी सोडत
खंडाळा – सातारा जिल्हा परिषदेच्या स्वनिधी सन २०२४ – २५ मधून वैयक्तिक लाभाच्या कृषी विभागाच्या योजनांसाठी दि. १९ रोजी दुपारी तीन वाजता लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी दिली.
सन २०२४- २५ या वित्तीय वर्षासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून कृषी विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. त्यामध्ये कडबा कुटी, रोटाव्हेटर, ताडपत्री, पीव्हीसी पाइप, स्प्रे पंप, इलेक्ट्रिक मोटर, इंजिन बॅटरी स्प्रे पंप, सायकल कोळपे, मधपेटी इत्यादीसाठी पंचायत समितीस्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. योजनांसाठी मंजूर तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पात्र अर्जाची लॉटरी काढून ज्येष्ठता क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे.