खंडाळा – व्यसन म्हणजे जिवंत मरण असून व्यसनाच्या आहारी न जाता युवा पिढीने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.व्यसन मुक्तीचा मार्ग स्वीकारला तर जीवन सुखकर होईल,असे मत ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशिका रेश्मा काकडे यांनी व्यक्त केले.
तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत आमची शाळा व्यसनमुक्त हा उपक्रम राबविण्यात आला.त्यामध्ये खंडाळ्यातील राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीवर चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य शब्बीर नालबंद हे होते. यावेळी उपप्राचार्या अरुंधती गाढवे,माधुरी पोतदार,सविता गायकवाड, शर्मिला भोसले,मिता महामुनी, सुजाता परीट,गोरखनाथ भोसले,रविंद्रकुमार तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य शब्बीर नालबंद म्हणाले,जर युवक व्यसनाधीन असेल तर आपल्या देशाचे भविष्य दिशाहीन होईल. म्हणूनच व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे.व्यसन ही विकृती आहे.घातक विकृती शारीरिक प्रकृती बरोबरच पवित्र संस्कृती पोखरते. त्यासाठी सर्वांनी व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश गेजगे यांनी केले.शेवटी सर्व उपस्थितांचे प्रवीण बोरगावे यांनी आभार मानले.