खंडाळा – माहितीचा अधिकार वापर हि एक काळाची गरज असून त्याचा उपयोग जर आपण केला.तर जीवन उन्नत होण्यास मदत होते,असे मत प्रमुख वक्ते श्री खांडके यांनी खंडाळ्यात बोलताना व्यक्त केले
खंडाळा येथील राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये माहितीचा अधिकार दिन उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य शब्बीर नालबंद हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य अरुंधती गाढवे, माधुरी पोतदार, रविंद्रकुमार तळेकर, सविता गायकवाड, शर्मिला भोसले,सविता परीट,शितल कोंढाळकर,मिता महानुमी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बदलत्या काळात भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या कायद्याचा उपयोग होऊ शकतो असे प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान,माहितीचा अधिकार कार्यक्रमा निमित्त वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रमांचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण बोरगावे यांनी केले.तर सर्व उपस्थितांचे जयप्रकाश गेजगे यांनी आभार मानले.