खंडाळा – विभागीय शालेय खो- खो स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात राजेंद्र विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दरम्यान,रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे या स्पर्धा पार पडणार आहेत.
खंडाळा शहरात असणाऱ्या राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोल्हापूर विभागीय शालेय खो खो स्पर्धा पार पडल्या.त्यामध्ये १४ वर्षांखालील मुलांचा संघाने सांगली जिल्ह्याच्या संघावर मात करून कोल्हापूर विभागात खंडाळ्याच्या संघाने इंचलकरंजी संघावर एक डाव व एक गुण मिळवत विभागीय स्तरावर विद्यालयाच्या विजयाचा झेंडा रोवला. या संघाने प्रथम क्रमांक मिळाविला असून दि.१४ रोजी डेरवण, जि.रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे सांगण्यात आले.
या संघातील विजयी खेळाडू व मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक डी.जी.गाढवे,व्हि.एन.गाढवे,महेंद्र गाढवे,व्हि.एस.राऊत,विवेक तळेकर,प्रशिक्षक दिग्विजय खंडागळे,विनोद खंडागळे, आकाश लिमन, अनिकेत गाढवे यांचे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध गाढवे,प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्य अरूंधती गाढवे, उपमुख्याध्यापक सुशिला मोहिते,पर्यवेक्षक धनंजय महामुनी,शिक्षक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.