खंडाळा- मतदान हा आपला अधिकार असून प्रौढ अणि युवापिढीने मतदान करावे.तरच आपली लोकशाही टिकेल असे मत राजेंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांची मतदान जागृती रॅली राजेंद्र विद्यालयापासून चावडी चौक मार्गे तहसीलदार कार्यालयपर्यंत दाखल झाली. प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर शिक्षण विस्तार अधिकारी रमेश सावंत यांनी स्वागत केले.यावेळी केंद्रप्रमुख सुनीता साबळे, पोलीस हवलदार राजू अहिरराव,संजय जाधव, नगरपंचायत अधीक्षक अजय सोळसकर, शिक्षक, पालक आदी उपस्थित होते.
मतदान जनजागृती रॅलीनंतर सामूहिक प्रतिज्ञा व विविध कार्यक्रम घेण्यात आली.मतदान जागृती दिनानिमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा, निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा सांस्कृतिक विभाग प्रमुख पी.जी.बोरगावे व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख जे.बी.गेजगे यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
मतदान जागृती या कार्यक्रमासाठी खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे,सचिव अनिरुद्ध गाढवे,उपप्राचार्य अरुंधती गाढवे, उपमुख्यद्यापक सुशीला मोहिते,पर्यवेक्षक धनंजय महामुनी,संगिता निगडे यांनी शुभेच्छा व्यक्त करित मतदानाविषयी संकल्प पत्र घरा घरात पोहचवीत असे आवाहन केले.