खंडाळा – तालुक्यातील पारगांव येथे शुक्रवारी सातारा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी दिली.
खंडाळ्यातील राजेंद्र उच्चमाध्यमिक विद्यालय व प.पु. बापुजी साळुंखे विद्यालय असवली यांच्या संयुक्त विद्यमाने पारगाव (ता. खंडाळा) येथील मयुर मंगल कार्यालयात दि. 20 रोजी जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.यामध्ये शुक्रवारी 14,17 व 19 वर्षाखालील फ्री स्टाईल मुले तसेच शनिवारी मुलींच्या तर 17 व 19 वर्षाखालील मुले ग्रीको रोमन स्टाईलने स्पर्धा पार पडणार आहेत.
या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तालुक्याचे तहसिलदार अजित पाटील,खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, खंडाळा विभाग शिक्षण समितीचे सचिव अनिरुद्ध गाढवे, संत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव ढमाळ, तालुका क्रीडा अधिकारी सुमित पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.