खंडाळा – तालुक्यातील लोणंद येथे प्रियदर्शी नर्सिंग ॲड पॅरामेडिकल कॉलेजचा दि . 4 रोजी आरंभ होत असल्याची माहीती मोनिका सूरज मोरे यांनी दिली.
लोणंद ( ता. खंडाळा ) येथे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी धम्मदर्शना फाऊंडेशनच्यावतीने जीएनएम नर्सिग कॉलेजचा प्रारंभ होत आहे.दरम्यान, बारावी उतीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी दि. 28 पर्यंत प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
लोणंद येथील कृषीराज लॉन्सच्या नजीक सुरु होणाऱ्या प्रियदर्शी नर्सिग ॲड पॅरामेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती मिळणार असून बाहेर गावच्या विद्यार्थांना वस्तीगृह आणि मेस सुविधा उपलब्ध आहे.तरी सर्वांनी सुवर्ण संधीचा लाभ घेउन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.