सामाजिक

वारकऱ्यांसाठी नंदकुमार घाडगे यांच्याकडून पाण्याच्या टॅकरची सुविधा

खंडाळा – पायीवारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करीत तहान भागविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यामातून विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी सुरू ठेवले आहे.दरम्यान,पिण्याचे पाणी वाटप करण्याची सेवा अखंडपणे सुरु ठेवणार असल्याची ग्वाही घाडगे यांनी माध्यामांशी बोलताना दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपुर असा मार्गक्रमण करीत आहे.दरम्यान, माऊलींचा सोहळा शनिवारी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामी दाखल झाला आहे.

या पायीवारीमध्ये लाखो वारकरी सहभागी झाले आहेत.वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणुन शिवसेना उध्दव ठाकरे पक्षांकडून वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांच्यावतीने वारकऱ्यांना पाण्याच्या टॅकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तसेच श्री.संतश्रेष्ठ कान्हुराज महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे शॉल श्रीफळ देवून नंदकुमार घाडगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.तसेच जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, तालुका प्रमुख सागर कदम यांच्याहस्ते अल्पोपहार वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते. जनसेवा हिच ईश्वर सेवा मानत वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी राबविलेले उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!