नाते येथे दिंडी सोहळा उत्साहात
खंडाळा- हरिनामाचा जयघोष अन् टाळ मृदुंगाचा गजर करीत महाड तालुक्यातील नाते गावामध्ये श्री.सद्गूरु अनंत महाराज विद्यालयात ‘ रिंगण सोहळा ‘ उत्साहात पार पडला.
नाते (ता.महाड) येथे आषाढी एकदशीचे औचित्य साधत आचलोळी येथील कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.दरम्यान,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी.जे. गिम्हंवणेकर,कार्यक्रम समन्वयक प्रा.वी. आर.पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. एस.दिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी सोहळा नाते गावात दाखल झाला.हाती भगव्या पताका तसेच पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशभूषा विद्यार्थी सहभागी झाले होते. माऊली, माऊली अशा जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर अभंग आळवीत फुगड्या खेळ आबालवृद्धांनी आनंद लुटला.त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी,ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता.
दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी कृषीकन्या ममता आलान,सोनाली चव्हाण,करुणा चोपडे,मानसी गायकवाड, गायत्री माने,प्रियंका मोरे,अनन्या पंगेवाड, भविका पाटील यांनी परिश्रम घेतले.